थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Raigad ) रायगड जिल्हा परिषदेचा तिढा सुटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. काल रायगड जिल्हा परिषदेबाबत नंदनवनवर बैठक झाली. या सुनील तटकरे, उदय सामंत, एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री ही बैठक पार पडली.
मात्र या बैठकीत कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नसल्याची माहिती मिळत आहे. रायगड मध्ये जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी व भाजपची सत्ता येण्याची दाट शक्यता असून खासदार सुनील तटकरे हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
रायगड जिल्हा परिषदेचा तिढा सुटता सुटेना
बैठकीत कोणताही सकारात्मक तोडगा नाही
रायगड जिल्हा परिषदेबाबत नंदनवनवर झाली बैठक