थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(MHADA ) म्हाडा विविध वसाहतींमधील 118 घरे विकणार असल्याची माहिती मिळत आहे. म्हाडाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील 118 घरे 'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर विकली जाणार आहेत.
ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया आजपासून सकाळी 11 वाजता सुरू करण्यात येणार आहे. अर्जदारांनी अर्ज करण्याकरिता संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करणे आवश्यक असणार असून अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, घर निश्चित करणे या सर्व प्रक्रियेला ४ मार्च रोजी सकाळी 11 पासून करण्यात येणार आहे.
घर निश्चित करण्यापूर्वी आवश्यक अनामत रक्कम व अर्ज शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे. सदनिका निश्चिती केल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने सदनिकेच्या विक्री किमतीच्या 10 टक्के रक्कम 48 तासांच्या आत भरावी लागणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
म्हाडा विविध वसाहतींमधील 118 घरे विकणार
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
सदनिकेच्या विक्री किमतीच्या 10 टक्के रक्कम 48 तासांच्या आत भरावी लागणार