Narhari Zirwal 
महाराष्ट्र

Narhari Zirwal : मंत्री नरहरी झिरवळ सकाळपासून नॉटरिचेबल; मंत्रालयातील एसीबीच्या कारवाईमुळे मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत?

मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न, औषध प्रशासन विभागात ACBने कारवाई केली.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Narhari Zirwal) मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न, औषध प्रशासन विभागात ACBने कारवाई केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागातील एका लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली.

आरोपीचे नाव राजेंद्र ढेरंगे असे आहे. एका मेडिकल स्टोअरचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करण्यासाठी लिपिकाने आधी 50000 रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर 35000 रुपयांची लाच घेताना त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लाच आरोपीला पकडण्यात आले आहे. यातच आता सकाळपासून मंत्री नरहरी झिरवळ नॉटरिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. मंत्रालयातील एसीबीच्या कारवाईमुळे मंत्री नरहरी झिरवळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून संबंध आढळून आल्यास राजीनामा देण्याचा झिरवाळ यांनी खुलासा केला होता.

Summary

  • सकाळपासून मंत्री नरहरी झिरवळ नॉटरिचेबल

  • मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे मंत्री नरहरी झिरवळ अडचणी

  • संबंध आढळून आल्यास राजीनामा देण्याचा झिरवाळ यांनी केला होता खुलासा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा