थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Rohit Pawar ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले . विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
या विमान अपघातावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पक्षासह विरोधी पक्षातील नेत्यांनी अपघाताबाबात शंका उपस्थित केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज रोहित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे रोहित पवार ही पत्रकार परिषद घेण्यात येणार असून संध्याकाळी 4.30 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे आता रोहित पवार विमान अपघाताबद्दल काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे असणार असून रोहित पवार कोणता खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Summary
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले
आमदार रोहित पवारांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद
कोणता मोठा खुलासा करणार?