Rohit Pawar 
महाराष्ट्र

Rohit Pawar : 'अहमदाबाद विमान अपघातात पायलटनेच फ्यूल स्विच बंद केल्याची बातमी बघता, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत...'; रोहित पवारांचे ट्विट

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Rohit Pawar) अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाला. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

यातच आता अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. या माहितीनंतर आता बारामतीतील अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी ट्विट करत सवाल उपस्थित केला आहे.

रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, 'अहमदाबाद विमान अपघातातात पायलटनेच फ्यूल स्विच बंद केल्याची बातमी बघता, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला. बारामती अपघाताबाबत देखील यादृष्टीने तपास होऊन पायलटवर कोणाचा दबाव होता का ? याबाबत कसून, सखोल आणि निष्पक्ष #तपास_झालाच_पाहिजे.' असे रोहित पवार म्हणाले.

Summary

  • अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

  • अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी नवीन माहिती समोर

  • रोहित पवार यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा