महाराष्ट्र

Mulund Metro: मुलुंड अपघात प्रकरणी MMRDAकडून DB HILL LBG या सल्लागार कंपनीची हकालपट्टी

Mulund Metro 4: मुंबईतील मुलुंड मेट्रो ४ प्रकल्पात झालेल्या अपघातानंतर एमएमआरडीएने डीबी-एचआयएलएल-एलबीजी सल्लागार कंपनीची हकालपट्टी केली, कंत्राट रद्द केले आणि कार्यकारी अभियंता सहित दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

वडाळा-ठाणे-कासारवडवली मार्गिकेच्या मेट्रो ४ प्रकल्पाच्या कामादरम्यान झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) डीबी-एचआयएलएल-एलबीजी या सल्लागार कंपनीची हकालपट्टी केली आहे.

या अपघातानंतर एमएमआरडीएने तातडीने सल्लागार कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. यासोबतच प्रकल्पाशी संबंधित कार्यकारी अभियंत्याला निलंबनाची कारवाई करण्यात आली. केवळ यावर थांबून राहिलेली नाही, तर आणखी दोन अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांमध्ये अधीक्षक अभियंता आणि उपअभियंत्यांचा समावेश आहे. तसेच, मुख्य अभियंत्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्पष्ट आदेशांनुसार करण्यात आली आहे. अपघातानंतर झालेल्या तक्रारी आणि सुरक्षेच्या मुद्द्यांमुळे एमएमआरडीएने कठोर पावले उचलली असून, मेट्रो प्रकल्पाच्या कामाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पुढील कारवाया सुरू राहतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे मेट्रो प्रकल्पातील कामकाजावर लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

  • एमएमआरडीएने मुलुंड मेट्रो ४ अपघातानंतर DB HILL LBG ची हकालपट्टी केली.

  • कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि उपअभियंत्यांना निलंबित करण्यात आले.

  • प्रकल्पाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विभागीय चौकशी सुरू.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कठोर कारवाई.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा