Mumbai Mayor Election 
महाराष्ट्र

Mumbai Mayor Election: मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी पीठासीन अधिकारी नियुक्त, महापौर निवड पीठासीन अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली होणार

Bhushan Gagrani : मुंबई महापालिका महापौर निवडीसाठी भूषण गगराणी पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत.

Published by : Dhanshree Shintre

मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत गडद सुरू झाली असून, महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया वेग घेतली आहे. राज्य सरकारने अधिसूचना जारी करून पुढील आठवड्यात निवड होणार असल्याचे जाहीर केले. यावेळी विशेष बदल म्हणजे महापौर निवडीवेळी सभागृहात आयुक्त भूषण गगराणीच पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील.

मागील नियमांनुसार नव्या सभागृहाची पहिली बैठक ज्येष्ठ नगरसेवक किंवा प्रधान सचिव दर्जाच्या खालील अधिकाऱ्याच्या नेतृत्वात होई. पण आता फक्त आयुक्त किंवा प्रशासकच पिठासीन अधिकारी असतील. मागच्या सभागृहाचा कार्यकाळ संपून तीन वर्षे झाली, त्यामुळे मावळता महापौर ही संकल्पना संपली. जुन्या नियमात उद्धव ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना हा अधिकार होता, पण तो काढून घेतला गेला.

प्रशासनाने अधिसूचना जारी केल्यानुसार निवड प्रक्रिया लवकरच पार पडेल. या बदलामुळे निवडणुकीत पारदर्शकता वाढेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असून, महापौरपदासाठी आरक्षणानुसार लढत रंगणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा