Mumbai University exams postponed, know the new schedule 
महाराष्ट्र

Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, जाणून घ्या नवे वेळापत्रक

Mumbai University Exam Time Table 2026 : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Published by : Riddhi Vanne

Mumbai University Exam Time Table 2026 : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचा गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यात शोककाळ जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला. आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.

याआधीही महापालिका निवडणुकीमुळे जानेवारीतील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्याचे नियोजन होते. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने 4 ते 6 फेब्रुवारीदरम्यानच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या.

या पुढे ढकललेल्या परीक्षा आता 17, 18 आणि 20 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. तसेच 28 जानेवारी रोजी दुपारच्या सत्रातील परीक्षा २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत घेतल्या जातील. सुधारित परीक्षा वेळापत्रक लवकरच सर्व महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना कळवण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.

थोडक्यात

  1. मुंबई विद्यापीठाने 9 आणि 10 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा नंतरच्या तारखेस हलवल्या.

  2. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय.

  3. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यात शोककाळ जाहीर झाला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा