NCP 
महाराष्ट्र

NCP : अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी; राष्ट्रवादीची मागणी

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(NCP) अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे.

या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या विमान अपघातावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. या घटनेचा आता तपास करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी राष्ट्रवादीकडून मागणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना राष्ट्रवादी सीबीआय चौकशी प्रकरणी पत्र पाठवणार असल्याची माहिती मिळत असून काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून निवेदन देण्यात आले.

Summary

  • अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशीची राष्ट्रवादीची मागणी

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना राष्ट्रवादी पत्र पाठवणार

  • काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीकडून निवेदन

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा