थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Uddhav Thackeray) महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि आता महापौर कुणाचा बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आज गट नोंदणीसाठी कोकण भवनात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
ठाकरे सेनेचे सर्व 65 नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण आयुक्त कार्यालय बेलापूर येथे जाणार असून मुंबई महापालिकेसाठी गटाची नोंदणी केली जाणार आहे.
सर्व नगरसेवक दादर मधील शिवसेना भवन येथे सकाळी दहा वाजता एकत्र जमतील यानंतर सर्व नवनिर्वाचित नगरसेवक एकत्र जमल्यानंतर कोकण भवन येथे जाण्यास निघतील. सर्व नगरसेवकांना एकाच बसमधून घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आज गट नोंदणीसाठी कोकण भवनात जाणार
ठाकरे सेनेचे सर्व 65 नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण आयुक्त कार्यालय बेलापूर येथे जाणार
सर्व नगरसेवकांना बसमधून कोकणभवनात नेलं जाणार