पुण्यातील मुंढवा परिसरातील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांचा कोणताही थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग नसल्याचे खरगे समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडून तब्बल २० दिवस उलटले असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाची अधिकृत गटनोंदणी रखडलेली होती. या विलंबामुळे महापालिकेतील राजकीय गणितांबाबत चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, आज कोकण आयुक्त कार्यालय, बेलापूर येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाची अधिकृत नोंदणी करण्यात येणार आहे.
राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्रीपदाचा अधिकृत पदभार स्वीकारणार आहेत. ३१ जानेवारी रोजी मुंबईतील ‘लोकभवन’ येथे साधेपणाने पार पडलेल्या शपथविधीनंतर आता त्या प्रशासकीय कामकाजात प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. त्यांच्या या पहिल्या मंत्रालयीन उपस्थितीकडे राजकीय वर्तुळासह प्रशासनाचेही विशेष लक्ष लागले आहे.
मुंबईतील बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी धारावी पुनर्विकास प्रकल्पात गंभीर गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे घरे लाटल्याचे आरोप समोर आले आहेत. या प्रकरणाची दखल घेत धारावी पुनर्विकास प्रकल्प (DRP) प्रशासनाने त्रिसदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
तत्काळ तिकीट आरक्षण करताना तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना रिफंड न देण्याच्या भारतीय रेल्वेच्या नियमाविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. वकील सचिन तिवारी यांनी ही याचिका दाखल केली होती. तत्काळ तिकीट रद्द केल्यावर प्रवाशांचे पैसे परत न देणे हे मनमानी, अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.
पुणे–मुंबई हा राज्यातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा महामार्ग मंगळवार रात्री घडलेल्या अपघातामुळे तब्बल ३२ तास ठप्प झाला होता. बुधवारी रात्री दीडच्या सुमारास एका गॅस टँकरचा भीषण अपघात झाला. संबंधित टँकर पलटी झाल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अखेर प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर गुरुवारी सकाळपासून वाहतूक हळूहळू सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुनेत्रा पवार यांना आता ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्यात येणार असून, यासंबंधीचा निर्णय बुधवारी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, तब्बल 1 हजार 164 शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहाची सोय नसल्याची बाब उघड झाली आहे. एवढेच नव्हे तर 3 हजार 328 शाळांमध्ये अद्याप वीज सुविधा उपलब्ध नसल्याचेही समोर आले आहे. शिक्षण विभागाने तयार केलेल्या 2024 ते 2026 या कालावधीतील सांख्यिक अहवालातून ही गंभीर माहिती समोर आली असून, हा अहवाल 29 जानेवारी रोजी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना सादर करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांची घोषणाबाजी
'खरगेंचं वाढतं वय पाहता, त्यांनी बसून घोषणा द्याव्या'
पंतप्रधान मोदींचा खरगेंना टोला
आज मुंबईहून मुंडे सातारा येथे जात जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारसभेला संबोधित करणार होत्या
दुपारी १ वाजता महालक्ष्मी रेसकोर्सहून सातारा सैनिक स्कूल येथे आगमन आणि त्यानंतर पिंपोडे बुद्रुक येथे प्रचारसभेला संबोधित करणार होत्या
शेतकऱ्याने फिरवला कांद्यावर रोटर..कांद्यावरील निर्यात बंदी उठवा, शेतकऱ्यांकडून मागणी ..खत आणि बियाणाचे भाव गगनाला भिडलेले
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर रिपब्लिकन सेनेच आंदोलन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन
कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणदान
या निर्णयाविरोधात आंदोलन
नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा होता निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या बाहेर रिपब्लिकन सेना आंदोलन करणार आहे
गडचिरोलीत आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित पाच दिवसीय कृषी महोत्सवाला मोठ्या थाटात सुरूवात झाली. यावेळी विविध शेतकरी गटांना आणि लाभार्थ्यांना योजनांमधून अनुदानाचे वाटप करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील 562 गावांना पहिल्या टप्प्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार असून त्यासाठी आदिवासी विकास विभागासह खनिज प्रतिष्ठानचा निधी वापरला जाईल अशी माहिती यावेळी सहपालकमंत्री आशिष देशमुख यांनी दिली.
सकाळी १० वाजता नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन
मराठमोठ्या पद्धतीनं कार्यक्रम पार पडणार
मुंबई अध्यक्ष अमित साटम, गटनेते गणेश खणकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
७ फेब्रुवारी रोजी ह्या कार्यालयातून महापौर पदाचा उमेदवार निवडला जाणार
गेले ३ वर्ष प्रशासक बसल्याने कार्यालय होती बंद
जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ साठी सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजना या तीनही योजनांकरिता ६९२.७४ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
सोमवारी तीन वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत इतर सर्व सदस्य बैठकीला राहणार उपस्थित
आज झालेल्या बैठकीत पहिल्या फेजच्या कामासंदर्भात सर्व सदस्यांना आढावा देण्यात आला
तसेच पुढील कामाबाबतचा आढावा घेण्यात आला
सोमवारी होणाऱ्या बैठकीत पुढील कामाचे टेंडरिंग आणि कंटेंट याबाबत होणार चर्चा
पमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रवादीच्या आमदार, माजी आमदारांना थेट फोन
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात सुनेत्रा पवार यांनी आमदारांकडून घेतला आढावा
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या आमदार, माजी आमदारांशी फोनवरून साधला संवाद
पुणे जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद उमेदवारांनाही सुनेत्रा पवार यांनी केला फोन
अकोल्यातील मूर्तिजापूरवरून कारंजाकडे जणाऱ्या कारचा भीषण अपघात झाल्याने दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मूर्तिजापूर-कारंजा रोडवरील उमरी अरब गावाजवळ भरधाव जाणाऱ्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतात जाऊन पलटी झाली, त्यामुळे यामध्ये प्रवास करणारे दोन जण जागीच ठार झाले तर चार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून, घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत. अपघाताचा पूढील तपास पोलीस करत आहेत.
कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या वतीने ५ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत कृषीपर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटनानंतर पालकमंत्री विखे पाटील यांनी महोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध स्टॉल्सची पाहणी केली.
महाडच्या एमआयडीसी मध्ये कंपनीला भीषण आग
एम्बायो कंपनीला भीषण आग
औषधी अमली पदार्थ बनवणाऱ्या कंपनीला आग
भीषण आगीमुळे कंपनी परिसरात भीतीचे वातावरण
आगीमुळे परिसरात धुराचे लोट
महाडच्या एमआयडीसीमध्ये आग, एम्बायो कंपनीला आग, आगीमुळे परिसरात धुराचे लोट