थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nitesh Rane) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय निवासस्थानी राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 600 कोटींचा प्रारूप आराखडा सादर केला आहे.
वाढत्या विकासाच्या गरजा लक्षात घेता पायाभूत सुविधा, पर्यटनविकास, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण भागातील रस्ते व जलसंधारण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी जिल्हा नियोजन निधीत भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी यावेळी केली असल्याची माहिती मिळत आहे.
राज्याच्या वार्षिक योजना सन 2026-27 च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
Summary
मंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आराखडा
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 600 कोटींचा प्रारूप आराखडा
आराखडा राज्य नियोजन समितीच्या बैठकीत सादर