थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mira-Bhayandar Municipal Corporation) मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी भाजपने दुसर्यांदा डिंपल मेहता यांच्या नावाची निवड केली आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून निवडून आलेल्या डिंपल मेहता या दुसर्यांदा महापौरपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
मिरा- भाईंदर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीसाठी कोकण विभागीय आयुक्तालयातर्फे 3 फेब्रुवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता महापौरपदी मराठी उमेदवाराची निवड करावी, अशी मागणी मराठी एकीकरण समिती व मनसेने केली आहे. मराठी उमेदवार नसेल, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
महापौर मराठीच असावा यासाठी आज सकाळी 10 वाजता मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र आंदोलनाआधीच मराठी समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संबंधित आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटिसा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या नोटीसांमुळे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
Summary
आंदोलनाआधीच मराठी समितीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस
मीरा-भाईंदरमध्ये मराठी समिती, मनसे करणार होते आंदोलन
अमराठी महापौर दिल्याच्या विरोधात करणार होते आंदोलन