थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Shiv Sena UBT) महापालिका निवडणुकीनंतर आता नागपूरातील ठाकरेंच्या शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. मनपा निवडणुकीत बंडखोरी करत उभे राहिलेले नितीन तिवारी यांच्याकडून शहर प्रमुख पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे.
तर नव्याने निवडून आलेले नगरसेवक किशोर कुमेरिया यांच्यावर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मनपा निवडणुकीदरम्यान नितीन तिवारी आणि किशोर कुमेरिया यांच्यात एबी फॉर्म आणि उमेदवारीवरून चांगलाच वाद झाला होता.
प्रमोद मानमोडे यांची रामटेक लोकसभा सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून विक्रम राठोड, हरीभाऊ बानाईत, संदीप पटेल यांची शहर प्रमुखपदी नियुक्त करण्यात आली आहे.
Summary
मनपा निवडणुकीनंतर नागपूरातील ठाकरेंच्या शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल
नितीन तिवारी यांच्याकडून शहर प्रमुख पदाचा कार्यभार काढून घेतला
किशोर कुमेरिया यांच्यावर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली