Bhandara  
महाराष्ट्र

Bhandara : भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त चढले पाण्याच्या टाकीवर; मागील 40 वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्रलंबित

भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त चढले पाण्याच्या टाकीवर चढल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Bhandara) भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त चढले पाण्याच्या टाकीवर चढल्याचे पाहायला मिळत आहे. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 249 गावांना अधिग्रहित करण्यात आलं. मागील ४० वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजूनही शासन दरबारी प्रलंबित आहेत.

वारंवार निवेदन दिले मोर्चे काढलेत विविध प्रकारची आंदोलने केलीत मात्र शासनाकडून केवळ आश्वासन देण्यात येते, असा आरोप करण्यात येत आहे.

प्रकल्पग्रस्त भाऊ कातोरे, दिलीप मडामे यांच्यासह अन्य काही प्रकल्पग्रस्त थेट नागपूर - भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील कवडशी फाट्यावर असलेल्या 80 फूट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर चढल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत थेट मंत्र्यांसोबत चर्चा होणार नाही तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही अन्यथा उंच टाक्यावरून उडी घेऊ असा इशारा या प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.

Summary

  • भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त चढले पाण्याच्या टाकीवर

  • मागील 40 वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या प्रलंबित

  • गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी 249 गावं अधिग्रहित

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा