Narhari Zirwal 
महाराष्ट्र

Maharashtra Politics : देवगिरीवर राजकीय हालचालींना वेग; झिरवाळ उपस्थितीत राष्ट्रवादीची निर्णायक बैठक

अन्न व औषध प्रशासन खात्यातील लाचलुचपत प्रकरणानंतर संपर्कात नसल्याची चर्चा असलेले मंत्री नरहरी झिरवळ अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी पोहोचले.

Published by : Riddhi Vanne

Narhari Zirwal : अन्न व औषध प्रशासन खात्यातील लाचलुचपत प्रकरणानंतर संपर्कात नसल्याची चर्चा असलेले मंत्री नरहरी झिरवळ अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या खात्यातील कारकूनाला मंत्रालयातच एसीबीने लाच घेताना पकडल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या कारवाईनंतर झिरवळ यांनी सार्वजनिक भूमिका मांडलेली नव्हती, त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते.

मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात कारकून राजेंद्र ढेरंगे याला रंगेहात अटक करण्यात आली. थेट मंत्रालयात घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनातील कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सायंकाळी सहा वाजता पार पडणाऱ्या या बैठकीला पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला ‘देवगिरी’ येथे पक्षाच्या कोअर कमिटीसह आमदारांशी संवाद साधत असत. त्याच धर्तीवर सुनेत्रा पवार प्रथमच सर्व आमदारांना एकत्र बोलावत आहेत. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल देखील दाखल झाल्याची माहिती आहे.

बैठकीत झिरवळ यांच्या खात्यातील कारवाईचा आढावा घेतला जाईल, तसेच पुढील प्रशासकीय आणि राजकीय पावले ठरवली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबाबतही प्राथमिक चर्चा होऊ शकते. त्यामुळे ‘देवगिरी’वरील ही बैठक राष्ट्रवादीच्या पुढील राजकीय दिशेचा सूर ठरवणारी ठरणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

थोडक्यात

  • अन्न व औषध प्रशासन खात्यातील लाचलुचपत प्रकरणानंतर संपर्कात नसल्याची चर्चा असलेले मंत्री Narahari Zirwal अखेर उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांच्या ‘देवगिरी’ शासकीय निवासस्थानी पोहोचले.

  • त्यांच्या खात्यातील कारकूनाला मंत्रालयातच एसीबीने लाच घेताना पकडल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.

  • कारवाईनंतर झिरवळ यांनी कोणतीही सार्वजनिक भूमिका मांडली नव्हती.

  • त्यामुळे त्यांच्या संपर्काबाबत आणि पुढील भूमिकेबाबत विविध चर्चांना उधाण आले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा