President Droupadi Murmu at Shegaon  
महाराष्ट्र

President Droupadi Murmu at Shegaon : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शेगावात! संत गजानन महाराजांचे दर्शन, कडक बंदोबस्त

President Droupadi Murmu at Shegaon : Droupadi Murmu द्रौपदी मुर्मू यांच्या शेगाव भेटीमुळे Shegaon शेगाव शहरात उत्साहासोबतच कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

Published by : Riddhi Vanne

President Droupadi Murmu at Shegaon : Droupadi Murmu द्रौपदी मुर्मू यांच्या शेगाव भेटीमुळे Shegaon शेगाव शहरात उत्साहासोबतच कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी रोजी त्या बुलढाणा जिल्ह्यातील महाआरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करणार आहेत.

राष्ट्रपतींच्या आगमनापूर्वी मंदिर परिसर आणि शहरातील प्रमुख ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पोलीस पथके शेगावात दाखल झाली आहेत. येणाऱ्या प्रत्येकाची काटेकोर तपासणी केली जात आहे.

भेटीदरम्यान राष्ट्रपती श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यामुळे 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 ते 12 या वेळेत दर्शन बंद राहील. तसेच 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 पर्यंत दर्शन व्यवस्था थांबविण्यात येणार आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे दर्शन सुरू होईल.

संस्थान आणि प्रशासनाने भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रपती हेलिकॉप्टरने शेगावात येऊन प्रथम मंदिरात दर्शन घेतील आणि त्यानंतर आयुष मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करतील. शेगाव शहर सध्या राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा