थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Droupadi Murmu ) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यासाठी आल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी 11.30 वाजता संतनगरी शेगावच्या दौऱ्यावर येणार आहेत. तसेच दुपारी 12.30 वाजता वाजता शेगांव येथे गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित 'आयुष राष्ट्रीय आरोग्य शिबीरा'चे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव देखील उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव शेगाव मंदिर आज सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
शेगाव शहर सध्या राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संत गजानन महाराजांचे दर्शन घेणार आहेत. यामुळे मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
Summary
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा दुसरा दिवस
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावच्या दौऱ्यावर
द्रौपदी मुर्मू गजानन महाराजांचं दर्शन घेणार