थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( PM Narendra Modi ) आज 77वा प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीमध्ये पहाटेपासून मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जात आहे.
देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह आहे. विविध ठिकाणी तिरंगी रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भारताची सांस्कृतिक विविधता, देशाची सैन्य शक्ती आणि वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ पाहता येणार आहेत. हा दिवस संपूर्ण देशभक्तीने साजरा होताना पाहायला मिळतो.
याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. भारताच्या अभिमानाचे आणि वैभवाचे प्रतीक असलेला हा राष्ट्रीय सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण करो. विकसित भारताचा संकल्प आणखी दृढ होवो. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Summary
आज 77वा प्रजासत्ताक दिन
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
'विकसित भारताचा संकल्प आणखी दृढ होवो'