पुण्यात वाहतूक पोलिसांचा अजब कारभार समोर आला आहे. नो-पार्किंगमधील वाहने उचलत असताना एका दुचाकीस्वाराला देखील दुचाकीसह उचलण्याल आलं. नाना पेठ परिसरातील धक्कादायक प्रकार उपस्थितांनी कॅमेऱ्यात कैद केला.
गुरुवारी सायंकाळी समर्थ वाहतूक पोलीस विभागाअंतर्गत असलेल्या नाना पेठ परिसरात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यावेळी वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वाराची गाडी नो-पार्कींगमध्ये असल्याचा दावा केला.
यानंतर दुचारीस्वार आणि पोलिसांमध्ये वाद-प्रतिवाद झाले. यानंतर दुचाकीस्वाराने उठण्यास मनाई केली. यानंतर पोलिसांनी थेट दुचाकीस्वारासह बाईक उचचली.