थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Pune ) पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात आईकडून मुलगा आणि मुलीवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मूळच्या नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या या महिलेने आपल्या पोटचा मुलांना मारले असून या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमागचं कारण अद्याप समोर आले नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनं संपूर्ण पुणे हादरलं आहे.
Summary
पुण्यात चाललंय तरी काय?
आईकडून मुलगा आणि मुलीवर हल्ला
पुण्यातील वाघोलीतील धक्कादायक घटना