Rajyasabha Election 
महाराष्ट्र

Rajyasabha Election : राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी; काही प्रमुख नावांची चर्चा

राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Rajyasabha Election) राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी पार पडणार आहे.

याच्याआधी यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च असून 6 मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

मागील काही वर्षात भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर पाठवले गेले. त्यामुळे आता तरी निष्ठावंतांचा विचार व्हावा, असे भाजपच्या एका गटाचे मत असल्याची माहिती मिळत आहे. भाजपमध्ये काही प्रमुख नावांची राज्यसभेसाठी चर्चा असून यामध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील, रामदास आठवले यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • राज्य सभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी वाढली

  • राज्यसभेवर आयारामाना संधी न देता पक्षातील निष्ठावंताना संधी मिळावी, यासाठी भाजपच्या काही निष्ठावंतांचे प्रयत्न

  • भाजपमध्ये काही प्रमुख नावांची राज्यसभेसाठी चर्चा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा