Nashik  
महाराष्ट्र

Nashik : दिंडोरी नाक्यावर रिक्षाचालकाचा पोलिसावर जीवघेणा हल्ला

दिंडोरी नाक्यावर रिक्षाचालकाने पोलिसावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Nashik ) दिंडोरी नाक्यावर रिक्षाचालकाने पोलिसावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राँग साइडने येणारी रिक्षा अडवल्याचा राग मनात धरून मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

लोखंडी वस्तूने डोक्यावर वार करण्यात आला असून यामध्ये पोलीस अंबादास तांदळे जखमी झाले आहेत. यामध्ये साथीदार दुचाकीस्वारासह दोघांविरुद्ध पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठवडाभरात ही दुसरी घटना घडली असून वाहतूक नियम तोडल्याबद्दल जाब विचारताच रिक्षा चालकाने वाद घातला होता. यामुळे आता वाहतूक पोलीसच असुरक्षित असल्याची चर्चा सुरू झाली असून आता संताप व्यक्त केला जात आहे.

Summary

  • दिंडोरी नाक्यावर रिक्षाचालकाचा पोलिसावर जीवघेणा हल्ला

  • राँग साइडने येणारी रिक्षा अडवल्याचा राग मनात धरून मारहाण

  • साथीदार दुचाकीस्वारासह दोघांविरुद्ध पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा