महाराष्ट्र

Rohit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांची शंका, सखोल चौकशीची मागणी

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे अनेक नवे प्रश्न समोर आले आहेत.

Published by : Riddhi Vanne

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे अनेक नवे प्रश्न समोर आले आहेत. त्यांनी या घटनेबाबत गंभीर संशय व्यक्त करत सखोल तपासाची गरज असल्याचं सांगितलं.

रोहित पवार म्हणाले की, अजितदादा मूळत: मुंबईहून पुण्याला गाडीने जाणार होते. तसंच नियोजनही केलं होतं. मात्र एका महत्त्वाच्या भेटीमुळे त्यांना उशीर झाला. वेळ हातातून निघून गेल्याने शेवटी त्यांच्यासमोर विमानाने जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे घाईघाईत विमान बुक करण्यात आलं.

अपघाताबाबत बोलताना रोहित पवार यांनी थेट शंका उपस्थित केली की, ही घटना अपघात नसून घातपात असू शकतो. मोठ्या नेत्याच्या मृत्यूकडे दुर्लक्ष करता येणार नाही. काही वेळा एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी अप्रत्यक्ष मार्ग वापरला जातो, असंही त्यांनी सूचकपणे सांगितलं. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी ठाम मागणी रोहित पवार यांनी यावेळी केली.

थोडक्यात

  • अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

  • नवे प्रश्न समोर आले आणि गंभीर संशय व्यक्त केला.

  • सखोल तपासाची गरज असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

  • अजित दादा मूळत: मुंबईहून पुण्याला गाडीने जाणार होते.

  • नियोजनानुसार प्रवास ठरला होता, पण महत्त्वाच्या भेटीमुळे उशीर झाला.

  • वेळ न मिळाल्यामुळे विमानाने जाणे ही अंतिम पर्याय ठरला.

  • त्यामुळे घाईघाईत विमान बुक करण्यात आले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा