थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Saamana Editorial ) बदलापूर शहर पुन्हा एकदा अत्याचाराच्या घटनेनं हादरलं आहे. 4 वर्षाच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या स्कूल व्हॅनमध्ये नराधम चालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खाजगी इंग्रजी शाळेच्या स्कूल व्हॅनमध्ये या ४ वर्षाच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला.
महिला मदतनीस नसल्याची देखील धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता या घटनेवर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सामनाच्या अग्रलेखातून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
सामनातून म्हटले आहे की, 'बदलापुरात पुन्हा एका स्कूल बस चालकाने चार वर्षांच्या चिमुरडीचे लैंगिक शोषण करण्याचा अश्लाघ्य प्रकार केला. त्याकडे फक्त मानवी विकृती म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही. शाळाचालकांपासून सरकारपर्यंत सर्व यंत्रणांच्या षंढपणाचा हा परिणाम आहे.'
'बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला जर सत्ताधारी भाजपच स्वीकृत नगरसेवक म्हणून मिरवत असेल तर चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृत नराधमांना धाक कसा बसणार? राज्यातील लाडक्या बहिणी आणि लाडक्या लेकी सुरक्षित कशा राहणार?' असे सामनातून म्हटले आहे.
Summary
बदलापूर शहर पुन्हा एकदा अत्याचाराच्या घटनेनं हादरलं
4 वर्षाच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या स्कूल व्हॅनमध्ये अत्याचार
'पुन्हा बदलापूर' म्हणत बदलापूर अत्याचार प्रकरणावर सामनातून सरकारवर टीका