Sanjay Raut 
महाराष्ट्र

Sanjay Raut : "दाओसमध्ये देशभरातील मुख्यमंत्र्यांची पिकनीक सुरू"; संजय राऊत यांची टीका

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस दौऱ्यावर आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Sanjay Raut) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस दौऱ्यावर आहेत. या दावोस दौऱ्यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांची प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "देशभरातील मुख्यमंत्र्यांची पिकनीक दावोसला सुरू आहे. मी महाराष्ट्राच्या म्हणत नाही देशाच्या. मुख्यमंत्र्यांची पिकनीक बर्फात सुरू आहे. ती संपली की मुख्यमंत्री महापौरच्या निवडणुकीत लक्ष घालतील."

"दावोसमधली जी औद्योगिक कॉन्फरन्स आहे ती अत्यंत हास्यास्पद ठरते आहे. अनेक राज्याचे मुख्यमंत्री तिथे जातात. महाराष्ट्रात किती कोटीचे करार झालेत. 14 लाख रोजगार मिळणार आहे आणि मुंबईत 9 लाख रोजगार मिळणार. हे जे आकडे आहेत ते सुखावणारे आकडे आहेत. जेव्हा जेव्हा आपले मुख्यमंत्री दावोसला गेले तेव्हा हेच आकडे येतात. महाराष्ट्रात करार करा ना. तुम्ही या देशातील कंपनीशी करार दावोसला जाऊन करणार असाल आणि त्याचे फोटो सर्वत्र झळकवत असाल."

"आकडे कशाला फुगवून सांगतायत. 1000 हजार कोटींची गुंतवणूक खरोखर आली असेल तर 1000 हजार कोटीच सांगा. ज्या गोष्टी तुम्ही मुंबईत बसून करू शकता त्यासाठी अशाप्रकारे पंचतारांकित पिकनीक करण्याची गरज नाही." असे संजय राऊत म्हणाले.

Summary

  • मुख्यमंत्र्यांची दावोसला पिकनीक सुरु-राऊत

  • 'दावोसला जाऊन खरच गुंतवणूक येते का?'

  • 'गुंतवणुकीचे आकडे फुगवून कशाला सांगता?'

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा