Sanjay Raut 
महाराष्ट्र

Sanjay Raut : "महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक जीवनातला आजचा काळा दिवस"

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.

Published by : Siddhi Naringrekar

(Sanjay Raut) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांसह या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची मिळत आहे. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांची धडाडीचे नेते म्हणून देशभरात ओळख होती. विमानाचे बारामतीमध्ये लँडिंग होताना झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली आणि विमान जळून खाक झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक जीवनातला आजचा काळा दिवस आहे. आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईहून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी कळली तेव्हा आम्ही सर्व प्रार्थना करत होतो. पण दुर्दैवाने ही धक्कादायक आणि दु:खद बातमी आमच्या कानावर आली."

"अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण हे बेचव आणि अळणी होईल. त्यांचे व्यक्तिमत्व गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय दिलखुलास, रोखठोक. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विचित्र योगायोग आहे. श्रद्धांजली त्यांना कधी वाहावी लागेल असं कधी मनात आलं नाही. कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला." असे संजय राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा