थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Sanjay Raut ) कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिला आहे. मनसेच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, "कल्याण डोंबिवलीत जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनासुद्धा ती भूमिका मान्य नाही. ती पक्षाची भूमिका नाही. हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावर आमच्या लक्षात आले आहे."
"तुम्हाला जर स्थानिक लोकांना अशाप्रकारची युती करायची होती तर तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेबरोबर युती करायला नको होती. आमची एक भूमिका आहे आणि कठोर आणि कडवट आहे. तिथे शिंदे आणि भाजप एकत्र येऊ शकतात. इतरांना त्याच्यामध्ये जायचं कारण नव्हते. कोणत्या पातळीवर निर्णय घेतला हे त्यांनी सांगितले आहे. यावर आम्ही अंतर्गत चर्चा करू. त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे." असे संजय राऊत म्हणाले.
Summary
कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिला
संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनासुद्धा ती भूमिका मान्य नाही"