Nanded News 
महाराष्ट्र

Nanded News: नांदेडमध्ये भूसंपादन न करता बांधली शाळा, शाळेतील 128 विद्यार्थ्यांचं शिक्षण उघड्यावर

School Dispute: नांदेड जिल्ह्यात भूसंपादन न करता उभारलेल्या जिल्हा परिषद शाळेवर न्यायालयाने खासगी मालकांचा हक्क मान्य केल्याने 128 विद्यार्थ्यांचे शिक्षण उघड्यावर आले आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ऐन उन्हाळ्यात उघड्यावर शिक्षण घ्यावे लागत आहे. १९६० साली बांधलेली ही शाळा खासगी जमिनीवर उभी असल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने ११ फेब्रुवारी रोजी ती शेतकरी देवराव पौळ यांच्या वारसदारांच्या ताब्यात देण्यात आली. यामुळे १२८ विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात सापडले आहे.

जिल्हा परिषदने मावेजा न देता ही ६ गुंठे जागा ताब्यात घेतली होती आणि पहिली ते सातवीचे वर्ग चालवले. देवराव पौळ यांनी २०१४ पासून न्यायालयात हक्क सांगितला असता, दिवाणी न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. तत्कालीन अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही स्थिती ओढावली असून, शाळेच्या कोट्यवधी रुपयांच्या सुसज्ज इमारतीवर आता खासगी व्यक्तींचे नियंत्रण आहे.

स्थानिक नागरिक आणि पालकांनी जिल्हा परिषदेला तात्काळ पर्यायी जागा किंवा तात्पुरती इमारत उभारण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाने सरकारी जमीन व्यवस्थापनातील त्रुटींवर प्रकाश टाकला असून, शिक्षण विभागाने घाईने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

  • 1960 मध्ये खासगी जमिनीवर शाळा उभारली

  • न्यायालयाने जमीन मालकांच्या बाजूने दिला निकाल

  • 128 विद्यार्थ्यांचे वर्ग उघड्यावर सुरू

  • पर्यायी जागा देण्याची पालकांची मागणी

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा