थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sharad Pawar) मनपा निवडणुकीत जिंकलेली शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एकमेव जागा धोक्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे पराभूत उमेदवार विनोद मिश्रा यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे अजित रावराणे मालाड प्रभागातून जिंकून आले मात्र आता भाजपचे पराभूत उमेदवार विनोद मिश्रा यांनी थेट न्यायालयात आव्हान दिले असून लघुवाद न्यायालयात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अजित यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर या याचिकेतून करण्यात आला आहे.
Summary
राष्ट्रवादी SPची एकमेव जागा धोक्यात
पालिकेच्या निवडणुकीत अजित रावराणे मालाड प्रभागातून जिंकले
मात्र भाजपचे पराभूत उमेदवार विनोद मिश्रा यांनी थेट न्यायालयात आव्हान दिले आहे