थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिला आहे. मनसेच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी सध्या दावोसवर लक्ष केंद्रीत करत आहे. महाराष्ट्रात आल्यावर सर्व महाराष्ट्रातील करारांची माहिती मी तुम्हाला देईन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Summary
कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मनसेने पाठिंबा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
' मी सध्या दावोसवर लक्ष केंद्रीत करत आहे'