थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Shivsena - BJP) बदलापूरात शिंदेंची शिवसेना आणि भाजपात जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नगरसेवकाला भाजपा पदाधिकाऱ्याकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.
सोनिवली भागातील आत्मीया हाईड्स या सोसायटीमध्ये माघी गणपती दर्शनासाठी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हेमंत चतुरे आले होते,यावेळी भाजप पदाधिकाऱ्याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
या मारहाणीत चतुरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर बदलापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय,तेजस मस्कर असं मारहाण करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्याचं नाव आहे. मनपा निवडणूकीत पराभूत शिंदेंच्या उमेदवाराला स्वीकृत पद दिल्याने वाद झाल्याची माहिती मिळत आहे.
Summary
बदलापूरात शिंदेंची शिवसेना आणि भाजपात जुंपली
शिवसेना नगरसेवकाला भाजपा पदाधिकाऱ्याकडून बेदम मारहाण
मनपा निवडणूकीत पराभूत शिंदेंच्या उमेदवाराला स्वीकृत पद दिल्याने वाद