Solapur 
महाराष्ट्र

Solapur : अकलूजच्या यशवंत नगर मतदान केंद्रावर धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलाने केलं मतदान, नेमकं काय घडलं? Video

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज निवडणूक आहे

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Solapur) राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज निवडणूक आहे आणि सोमवारी 9 तारखेला मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडणार आहे.

यासोबतच 9 तारखेला सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता अकलूजच्या यशवंत नगर मतदान केंद्रावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषद उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या अल्पवयीन मुलाने मतदान केल्याचे पाहायला मिळत आहे.

या प्रकारामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अर्जुन सिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या पत्नी वैष्णवी मोहिते पाटील दोघेही निवडणूक लढत आहेत.

Summary

  • अकलूजच्या यशवंत नगर मतदान केंद्रावर धक्कादायक प्रकार

  • वडिलांसोबत गेलेल्या लहान मुलाने केलं मतदान

  • अर्जून सिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या अल्पवयीन मुलाने केले मतदान

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा