महाराष्ट्र

धक्कादायक! टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात महिलेवर अत्याचार, आरोपीला अटक

ठाणे परिसराला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

कल्याण : ठाणे परिसराला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. टिटवाळा रेल्वे परिसरात एका महिलेवर अत्याचार झाला आहे. रेल्वे रुळावरून घरी जात असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ घडली. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी विशाल चव्हाणला अटक केली आहे. सोमवारी, 13 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

पीडित तरुणी शहाड येथील एका खासगी कंपनीत काम करते. सोमवारी रात्री कंपनीतून बाहेर पडल्यानंतर पीडित महिला लोकल ट्रेनने टिटवाळा स्टेशनवर पोहोचली. तिचे घर स्टेशनपासून जवळच असल्याने ती घराच्या दिशेने रेल्वे रुळावरून चालली होती आणि ती पतीसोबत मोबाईलवर बोलत होती. यावेळी आरोपींनी तिचा पाठलाग सुरू केला. संधी मिळताच आरोपीने महिलेला बळजबरीने रेल्वे ट्रॅकजवळील झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

याच दरम्यान पीडित महिलेचा फोन सुरूच होता. आरोप्याने घटनेची कुठे वाच्यता केली तर जिवे मारू,अशी धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला.

तत्काळ आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत या नराधमाला पकडलं व पोलिसांच्या स्वाधीन केलं. विशाल चव्हाण असे या नराधमाचं नाव असून त्याच्या विरोधात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल हा पडघा येथे एका खाजगी कंपनीत काम करतो, याप्रकरणी डीसीपी मनोज पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा