महाराष्ट्र

डिलिव्हरी मॅन आणि इतर कर्मचा-यांच्या लसीकरण करण्याकरीता स्वतंत्र केंद्र चालू करा – विनोद मिश्रा

Published by : Lokshahi News

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एल.पी.जी. डिलिव्हरी मॅन आणि इतर कर्मचा-यांचे कोविड-१९ लसीकरण करण्याकरीता स्वतंत्र केंद्र चालू करा अशी मागणी बृहन्मुंबई महापालिका भारतीय जनता पक्षनेते श्री. विनोद मिश्रा यांनी श्री. सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी पत्राद्वारे केली. मुंबई मध्ये लोकांना घरोघरी एल.पी.जी. सिलिंडर पुरवठा करणाऱ्या डिलिव्हरी मॅन आणि इतर कर्मचा-यांच्या लसीकरणाबाबत दिनांक १४ जून २०२१ रोजी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी महापालिकेकडे व पक्षनेते विनोद मिश्रा यांच्याकडे विनंती केली होती. त्या अनुषंगाने सदर कर्मचा-यांचे लसीकरण करणे सोयीस्कर होण्यासाठी सदर मागणी करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवत लवकरात लवकर मुंबईत तीन स्वतंत्र कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यात येतील असे आश्वासन दिले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा