Lokshahi Journalist Chandrashekhar Bhange : लोकशाहीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्यावर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने पुणे शहर पोलीस आयुक्तांना पुणे श्रमिक पत्रकार संघकडून निषेधाचे निवेदन करण्यात आले आहे.
काल हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधार्थ भाजपाकडून पुण्यातील काँग्रेस भवन वरमोर्चा काढण्यात आला होता .यावेळी भाजप आणि काँग्रेस या दोघांमध्ये झालेल्या दगडफेकीत लोकशाहीचे पत्रकार चंद्रशेखर भांगे आणि इतर पत्रकार जखमी झालेत.
याचा निषेध करत पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आलाय. या संदर्भात पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन आज श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आलय.