थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Buldhana) बुलढाण्यात गणित न आल्याने शिक्षकाने चौथीतील विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला गणित चुकलं म्हणून शिक्षकाकडून अमानुष मारहाण करण्यात आली.
मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव रविंद्र आहे. या विद्यार्थ्याला आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी आता पोलीस कोणती कारवाई करतात याकडे लक्ष आहे.
Summary
गणित न आल्याने शिक्षकाची चौथीतील विध्यार्थ्याला अमानुष मारहाण
पिंपळगाव राजा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संतापजनक घटना
विद्यार्थी उपचारासाठी रुग्णालयात दाखल