थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Uddhav Thackeray) स्थायी समितीत ठाकरे सेनेला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सत्ताधारी पक्षाकडून सदस्य संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
स्थायी समितीत 27 सदस्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या भाजपाचे 10, शिवसेना 3 तर विरोधी पक्षातील उद्धव सेना 8, काँग्रेस 3 तसेच एमआयएम आणि मनसेचे प्रत्येकी 1 असे नगरसेवक असतील. ठाकरे सेनेचा 1 सदस्य कमी होऊन सत्ताधारी पक्षाचा 1 सदस्य वाढवण्याच्या हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
विरोधी पक्षातील दोन ते तीन नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला तर ठाकरे सेनेचा एक सदस्य कमी होऊ शकतो. अन्य पक्षीय नगरसेवकांच्या पाठिंब्यासाठीही भाजप-सेना प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्थायी समितीत ठाकरे सेनेला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Summary
स्थायी समितीत ठाकरे सेनेला फटका बसण्याची शक्यता
सत्ताधारी पक्षाकडून सदस्य संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू
विरोधी पक्षातील 2-3 नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यास ठाकरेंना फटका