There is a stir in the NCP before Sunetra Pawar's swearing-in ceremony, Jayant Patil's sensational revelation 
महाराष्ट्र

Jayant Patil : Big Breaking! सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळब, जयंत पाटलांचा खळबळजनक खुलासा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर राज्याचं राजकारण वेगाने बदलताना दिसत आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुन्या चर्चा पुन्हा समोर आल्या.

Published by : Riddhi Vanne

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर राज्याचं राजकारण वेगाने बदलताना दिसत आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुन्या चर्चा पुन्हा समोर आल्या असून, पक्ष एकत्र आणण्यामागची अजित पवारांची इच्छा उघड झाली आहे.

जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांना शरद पवार यांच्या उपस्थितीतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, असं मनापासून वाटत होतं. गेल्या काही महिन्यांत या विषयावर अनेक गुप्त चर्चा झाल्या होत्या. पक्ष एकत्र करण्याची जबाबदारी स्वतः शरद पवारांनी आपल्यावर सोपवली होती, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. या बैठका वारंवार पाटील यांच्या घरी होत होत्या. मतभेद विसरून पुन्हा एकत्र यावं, हा अजित पवारांचा ठाम विचार होता. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर एकत्र येण्याची घोषणा करण्याचंही ठरलं होतं. तारीखही निश्चित झाली होती, मात्र नियतीने वेगळाच खेळ केला.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, हा पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. सध्या त्या पक्षाचे निर्णय काही मोजके नेते घेत असल्याचं चित्र दिसत आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले असते तर त्यांनी महाराष्ट्रासाठी प्रभावी काम केलं असतं, असा विश्वास व्यक्त करत पाटील यांनी अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करण्याचं आवाहनही केलं. आज नेतृत्व बदललं असलं, तरी त्यांची इच्छा पूर्ण होईल का, हा प्रश्न मात्र उरतोच.

थोडक्यात

  1. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ

  2. या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग

  3. राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुन्या अंतर्गत चर्चा पुन्हा चर्चेत

  4. पक्षातील मतभेद आणि गटबाजीबाबत नव्याने चर्चा सुरू

  5. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्यामागची अजित पवारांची इच्छा उघड

  6. या घडामोडींचा आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा