(Maghi Ganesh Jayanti ) आज माघी गणेश जयंती आहे. ही गणेश जयंती माघ महिन्यात साजरी केली जाते. देशभरात माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. माघी गणेश जयंती 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजून 28 मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी 01 वाजून 42 मिनिटांपर्यंत असेल.
गणेश जयंतीनिमित्त मुंबई, पुण्याच्या गणपती मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. सकाळपासून भाविकांनी बाप्पााच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी केली आहे. मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं अयोजन करण्यात आलं असून गणेश जयंतीनिमित्त पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे.
तसेच मुंबईच्या सिद्धी विनायक मंदिरातही भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी रांग लावली आहे. गणेश जयंतीनिमित्त मंदिरं फुलांनी सजवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. गणपतीची पूजा करण्यासाठी तसेच गणपतीची प्राणप्रतिष्ठा पूजा करण्यासाठी दोन तासांचा शुभ मुहूर्त असेल.