(Republic Day) आज 77वा प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीमध्ये पहाटेपासून मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जात आहे. यासोबतच मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह असून आज राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर मुख्य कार्यक्रम होणार आहे.
येथे भारताची सांस्कृतिक विविधता, देशाची सैन्य शक्ती आणि वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ पाहता येणार आहेत. हा दिवस संपूर्ण देशभक्तीने साजरा होताना पाहायला मिळतो. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सगळीकडे कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. ठिकाठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे.
या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा कर्तव्यपथावर एकूण 30 विविध चित्ररथ पाहायला मिळणार असून त्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती पाहायला मिळणार आहे. तसेच यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथही सहभागी होणार असून या चित्ररथात महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे दर्शन घडणार असून महाराष्ट्राच्या चित्ररथावर अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोलताशे आणि गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळणार आहे.