देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने Perplexity Pro चे मोफत सबस्क्रिप्शन बंद करण्याची घोषणा केली असून, यामुळे युजर्समध्ये नाराजी व्यक्त होत आहे. २०२५ मध्ये लाँच झालेल्या या ऑफरची किंमत १७,००० रुपये होती, जी प्रीपेड प्लॅन युजर्सना मर्यादित काळासाठी मोफत मिळत होती. मात्र १६ जानेवारी २०२६ पर्यंतची मुदत संपल्याने ही सुविधा आता बंद झाली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम त्यांच्या युजर्सची प्रायव्हसी टिकून राहावी यासाठी सतत नवीन फीचर्स आणत आहे. मेटाच्या मालकीचा हा प्लॅटफॉर्म सध्या एका खास फीचरची चाचणी करत असून, त्यात युजर्सना एखाद्या 'क्लोज फ्रेंड्स' लिस्टमधून स्वतः बाहेर पडण्याची सुविधा मिळणार आहे. हे फीचर रिलीज झाल्यानंतर प्रायव्हसीचा पूर्ण कंट्रोल युजरच्या हातात राहणार आहे.
2 फेब्रुवारी रोजी भारतात सोन्या-चांदीच्या दरात अगदी हलका बदल पाहायला मिळाला. 24 कॅरेट सोनं प्रति ग्रॅम सुमारे 166,057 रुपये, तर 22 कॅरेट सोनं 17,719 रुपये दराने विकले जात आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव 12,043 रुपये प्रति ग्रॅम इतका आहे. 10 ग्रॅमचा विचार केला तर, 24 कॅरेट सोनं 1,60,570 रुपये, 22 कॅरेट सोनं 1,47,190 रुपये, तर 18 कॅरेट सोनं 1,20,430 रुपये दराने उपलब्ध आहे. चांदीच्या दरातही सौम्य घट झाली असून, प्रति ग्रॅम चांदी 349.90 रुपये आणि प्रति किलो 3,49,900 रुपये दराने विकली जात आहे.
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेंतर्गत दरमहा लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा होतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा तत्कालीन महायुती सरकारला मोठा फायदा झाला होता. आता पुन्हा महायुती सत्तेत आल्यावर निवडणूक प्रचारात १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सत्तेत येऊन दीड वर्ष लोटली तरी वाढ झाली नाही. अशा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घोषणा केली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचा गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यात शोककाळ जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला. आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.
टी-20 विश्वचषक 2026 मधील भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतल्यानंतर या मुद्द्यावर बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, आयसीसीशी चर्चा होईपर्यंत भारतीय मंडळ कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देणार नाही. पाकिस्तान सरकारने 15 फेब्रुवारीला होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात संघ उतरणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, स्पर्धेतील इतर सर्व सामने पाकिस्तान खेळणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पक्षाने वेगाने निर्णय घेत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. अर्थमंत्रिपद वगळता इतर तीन खात्यांची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली असून, राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. याशिवाय पक्षातील सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकारही त्यांना मिळाले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्हा भूकंपाने हादरला आहे. सोमवारी पहाटे हा भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा नुकसान झाल्याची माहिती मिळाली नाही. पहाटेच्या वेळी जमिनीला हादरे बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.