Urmila Kanetkar Urmila Kanetkar
महाराष्ट्र

Urmila Kanetkar : उर्मिला कानेटकरने घटस्फोटाच्या अफवांना दिला पूर्णविराम; सोशल मीडियावरील चर्चांवर परखड प्रतिक्रिया

मराठी फिल्म इंडस्ट्रीत अनेकदा कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी विविध चर्चा रंगताना दिसतात. त्यातही गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि अभिनेता-दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांच्या वैवाहिक नात्यामध्ये दुरावा आल्याची, दोघे विभक्त होणार असल्याची चर्चा जोर धरत होती.

Published by : Riddhi Vanne

(Urmila Kanetkar) मराठी फिल्म इंडस्ट्रीत अनेकदा कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी विविध चर्चा रंगताना दिसतात. त्यातही गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि अभिनेता-दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांच्या वैवाहिक नात्यामध्ये दुरावा आल्याची, दोघे विभक्त होणार असल्याची चर्चा जोर धरत होती. मात्र या सर्व अफवांना आता स्वतः उर्मिलानेच उत्तर दिलं असून, पहिल्यांदाच तिने या विषयावर मौन सोडलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्मिला कानेटकर हिने या चर्चांवर थेट प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर पसरविल्या जाणाऱ्या माहितीबाबत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “सोशल मीडियावर काय बोललं जातं याचा मी फारसा विचार करत नाही. त्या चर्चा बहुतेक वेळा टॉक्सिक असतात. काही गोष्टी खऱ्या असतात तर काही पूर्णपणे खोट्या. मी माझ्या कामात इतकी व्यस्त असते की कोण काय बोलतंय यावर लक्ष देणं मला गरजेचं वाटत नाही,” असं ती म्हणाली.

उर्मिलाने पुढे बोलताना प्रेक्षकांना आणि चाहत्यांना एक महत्त्वाचा संदेश दिला. “प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य असतात असं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला खरेपणाचा शिक्का मारणं योग्य नाही,” असं ती स्पष्ट म्हणाली. तिच्या या मताचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

उर्मिला–आदिनाथ नात्याचा प्रवास

उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांच्या नात्याविषयी बोलायचं झालं तर, दोघांची मैत्रीच प्रेमात रुपांतरित झाली आणि 2011 मध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. उर्मिला कोठारे कुटुंबाची सून झाली. सात वर्षांनी, म्हणजे 2017 मध्ये, या दोघांच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म झाला. तिचं नाव जिजा आहे. नवीन पाहुणीच्या आगमनानंतर सर्व काही सुरळीत असल्याचं दिसत असतानाच काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये मतभेद झाले असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या. त्यावरूनच त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना उधाण आलं. मात्र या सर्व गोंधळावर स्वतः उर्मिलानेच पडदा टाकला आहे.

अभिनेत्रीने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर तिच्या चाहत्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. सोशल मीडियावर पसरविल्या जाणाऱ्या अफवांबाबत उर्मिलाने जी भूमिका मांडली, तिचं अनेक जण कौतुक करत आहेत. तिच्या मतानुसार ‘सर्व गोष्टी व्हायरल होतात म्हणजे त्या खऱ्या असतातच असं नाही’, हेच सत्य आजच्या डिजिटल युगात सर्वांनी लक्षात ठेवावं. उर्मिलाच्या या परखड वक्तव्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे, हे निश्चित.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा