थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Yavatmal Rain) राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यातच यवतमाळमध्ये विजांसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात काही भागांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.
संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिके सुरक्षित ठेवावी. असे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
मेघगर्जना सुरू झाल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे उघड्यावर थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Summary
राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली
यवतमाळमध्ये विजांसह अवकाळी पावसाचा इशारा
प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना जारी