Navi Mumbai  
महाराष्ट्र

Navi Mumbai : नवी मुंबईत चाललंय तरी काय? नवी मुंबई बनतोय गुटखा माफियांचा अड्डा

महाराष्ट्रात गुटखा प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असताना नवी मुंबईत खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Navi Mumbai) महाराष्ट्रात गुटखा प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असताना नवी मुंबईत खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कळंबोली येथे खाजगी ट्रॅव्हल्समध्ये गुटख्याच्या गोणी भरून विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात गुटखा आणि पानमसाला यावर बंदी असतानाही काही भागांतून अवैध साठा व पुरवठ्याच्या तक्रारी समोर येत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

त्यामुळे आता नवी मुंबई सुद्धा गुटखा माफियांचा अड्डा बनत आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नवी मुंबई परिसरातील झोन-३, पनवेल, कळंबोली तसेच आसपासच्या भागांत प्रतिबंधित गुटख्याची तस्करी सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे.गुटखा विक्रीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

दरम्यान प्रायव्हेट गाडी मधून गुटख्याची विक्री होत असल्याने कोणत्याही प्रकाराची तपासणी केली जात नसल्याची माहिती मिळत असून या गुटखा विक्री प्रकरणात अनेक गुटखा माफियांची नावे आहेत. तसेच काही जणांवर तर आधीच विविध गुन्हे दाखल आहेत. मात्र इतक सगळं सुरू असून देखील नवी मुंबई पोलीस प्रशासनाला मात्र याची माहिती नाही का ? या संपूर्ण प्रकरणावर कारवाई कधी होणार ? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summary

  • नवी मुंबईत चाललंय तरी काय?

  • नवी मुंबई बनतोय गुटखा माफियांचा अड्डा

  • खुलेआम सुरू आहे प्रतिबंधित गुटखा विक्री

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा