Ajit Pawar Funeral 
महाराष्ट्र

Ajit Pawar Funeral : 'अजित दादा परत या', महिला भगिनींनी फोडला टाहो

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.

Published by : Siddhi Naringrekar

(Ajit Pawar Funeral) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या अपघाताचे भयावह फोटो, व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना एका शेतात कोसळल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीतील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.

मोठ्या संख्येने कार्यकर्ते अजित दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी आल्याचे पाहायला मिळत आहे. अजिदादांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. विद्या प्रतिष्ठान येथे अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. लाडक्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी लाडक्या बहि‍णींनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत असून अजित पवार यांच्या आठवणीत महिला भगिनींना अश्रू अनावर झाले. 'अजित दादा परत या' असे म्हणत महिला भगिनींनी टाहो फोडल्याचे पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा