थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ulhasnagar) उल्हासनगरमध्ये हुल्लडबाज तरुणांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. उल्हासनगर कॅम्प १ च्या भागातील हुल्लडबाज तरुणांच्या टोळीने अनेक गाड्यांची तोडफोड केली.
दुचाकी वरून आलेल्या १५ ते २० जणांच्या टोळक्यांनी कॅम्प १ च्या मोहता आणि दत्तवाडी परिसरात गाड्यांची तोडफोड करत हैदोस घातला. यामध्ये अनेक कार, रिक्षा आणि दुचाकींची त्यांनी तोडफोड केली असून रात्रीच्या सुमारास हा सगळा प्रकार घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक या तरुणांना पकडण्यासाठी परिसरात जमा झाले होते. पोलिसांना या सर्व घटनेची माहिती देण्यात आली.
Summary
उल्हासनगर मध्ये हुल्लडबाज तरुणांकडून गाड्यांची तोडफोड
अनेक कार, रिक्षा आणि दुचाकींची तोडफोड
उल्हासनगर कॅम्प १ च्या भागातील घटना