थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sunil Kedar) नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी राजीनामा दिला आहे. महापौर आणि उपमहापौर नाव निश्चितीवर सुनील केदार नाराज असल्याची माहिती मिळत असून प्रदेश पातळीवरून आलेले महापौर आणि उपमहापौर नाव ऐनवेळी बदलण्यात आल्याने सुनील केदार यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.
महापौर ,उपमहापौर नाव निश्चित केल्यानंतर नाशिक भाजपात असलेली अंतर्गत नाराजी समोर आल्याचे पाहायला मिळत असून काही दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्यासाठी देखील प्रस्ताव दिला होता. त्यानंतर आता सुनील केदार यांनी प्रदेश कमिटीला आपला पदाचा राजीनामा पाठवला आहे.
Summary
नाशिकमधील भाजपातील अंतर्गत नाराजी समोर
नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा
महापौर आणि उपमहापौर नाव निश्चितीवर सुनील केदार नाराज असल्याची माहिती