थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune ) पुणे विमानतळावर ड्रग्स तस्करीविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आरोपीकडून तब्बल 5 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पुणे विमानतळावर बँकॉकहून आलेल्या विमानाने संशयित आरोपी दाखल झाला असल्याची माहिती मिळाली.
'एअर इंटेलिजन्स युनिट'च्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आणि प्रवाशाच्या हालचालींवर आलेल्या संशयावरून आरोपीला तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर त्याच्या बॅगेची झडती घेतली तेव्हा त्याच्या बॅगेत पाच खेळण्यांचे बॉक्स सापडले. त्यात 'हायड्रोपोनिक वीड' लपविले होते.
Summary
पुणे विमानतळावर मोठी कारवाई
तब्बल 5 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
कस्टम विभागाकडून करण्यात आली कारवाई