थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Accident ) पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. सीएनजी पंपावर उभा असलेल्या महिलेला कार चालकाने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईला या कार चालकाने उडवल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील एका सीएनजी पंपावर हा सगळा प्रकार रात्री घडला असून कारचालक फरार झाला आहे.
पोलिसांनी या कार चालकाला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी शहजाद पुनावाला यांनी केली आहे. या अपघातात शहजाद पूनावाला यांच्या आई गंभीर जखमी झाल्या आहेत.
Summary
पुण्यात हीट अँड रनचा प्रकार
कारकारचालकाने एका महिलेला उडवलं
सीएनजी पंपावरील रात्रीची घटना,कारचालक फरार